सुभद्राई मंगल कार्यालय येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होती संघटने तर्फे जाऊन जयंतीनिमित्त पुण्य दिनी सोलापूर शहरातील ५ कर्तृत्वान अशा माता-भगिनींना सत्कार सन्मान शहराध्यक्ष भारत जाधव, शिवसेनेचे नेते माजी आमदार दिलीप माने, शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार, पाखर संकुल च्या संचालिका शुभांगी बुवा, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व माजी परिवहन सभापती राजन जाधव तसेच राष्ट्रवादी सरचिटणीस लता ढेरे यांचे हस्ते करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष आरती हुळ्ळे व सर्व सहकारी युवती पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.सध्याच्या करोणाच्या क्लेशदायक काळातदेखील संसाराचा गाडा सांभाळत आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण देत समाजात खंबीरपणे उभे राहण्याचे नेतृत्व मुलात तसेच प्रसंगी धाडस दाखवत समाजाला एक वेगळा आदर्श घालून देणाऱ्या सोलापुरातील ललिता चंद्रकांत कांबळे, निर्मला पुंडलिक बंडगर, लक्ष्मी बटगेरी, सुवर्णा ढेपे, पार्वती तुपसुंदर या ५ माता-भगिनींना तुळशीचे रोपटे शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या छोट्याश्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे तसेच शहर पदाधिकारी यांचे स्वागत राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे करण्यात आले.सर्वांचे स्वागत झाल्यावर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना गाऊन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला कामगार सेल शहर अध्यक्ष गोवर्धन संचु, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, सरचिटणीस ज्योतिबा गुंड, शिवराज विभुते, मिलिंद गोरे, विशाल कल्याणी, सर्फराज शेख, आशिष जेटिथोर, सुप्रिया लोमटे, अश्विनी भोसले, अमित रोडगे, किशोर चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी व महिला, युवती, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरती हब्बु हिने केले तर सत्कारमूर्ती यांची सुंदर अशी ओळख युवती अध्यक्ष आरती हुळ्ळे हिने करून दिली तर आभार प्रदर्शन महिला शहर अध्यक्ष सुनिता रोटे यांनी मानले.