महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती च्या अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सामाजिक न्याय भवनात समाज कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा आढावा बैठक घेतली या बैठकीला समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे, जातपडताळणी समितीच्या उपायुक्त छाया गाडेकर, समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव ,महापालिका नगरअभियंता कारंजे, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, महात्मा फुले महामंडळाचे व्यवस्थापक कांबळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक क्षीरसागर, माजी महापौर संजय हेमगडी, महापालिका सभापती अनुराधा काटकर ,नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेविका सुनीता रोटे ,नगरसेवक प्रवीण निकाळजे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, दिनेश म्हेत्रे, राजाभाऊ इंगळे ,कामगार नेते अशोक जानराव, युवराज पवार बाली मंडेपु सायमन गट्टू जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या शिवाजी भोसले काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या प्रमिला तुपलोंढे ,राजरत्न फडतरे यांच्यासह सामाजिक न्याय विभागातील विविध अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना रमाई घरकुल योजना, डॉक्टर आंबेडकर श्रमसाफल्य योजना, गटई कामगार स्टॉल योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवंत शिष्यवृत्ती योजना, शाहू महाराज गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, भारत सरकार मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ,अनुसूचित जाती नवबौद्ध बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील बळी ठरलेल्या नागरिकांना अर्थसाह्य योजना, विविध वसतिगृह योजना, कन्यादान योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना अशा विविध योजनांचे आढावा घेण्यात आला या आढावा बैठकीत संजय हेमगड्डी दिनेश म्हेत्रे युवराज पवार नगरसेविका करगुळे,नगरसेविका काटकर, सायमन गट्टू, बाली मंडेपु, यांनी विविध सूचना करताना घोषित झोपडपट्टी मध्ये प्रलंबित रमाई घरकुल योजनांचे कॅम्प लावा, गटई स्टॉल देताना महापालिकेची हमी द्या, रमाई आवास योजनेचा निधी साडेतीन लाख करा, सफाई कामगारांना घराचा मालकी हक्क मिळत नाही, श्रमसाफल्य योजना स्वतंत्रपणे राबवा, अनुसूचित जाती गृहनिर्माण संस्थेच्या जागावाटप मध्ये समाज कल्याण व महसूल मधे ताळमेळ असावी ॲट्रॉसिटी प्रकरणात अर्थसहाय्य मिळणाऱ्या लाभार्थ्याला जात दाखला ऐवजी शाळेचा दाखला ग्राह्य धरावा विविध सूचना केल्या..
यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मागासवर्गीय योजनांची प्रचार प्रसिद्धी नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये न घेन्याची सूचना करत रमाई व श्रमसाफल्य घरकुल योजनेच्या कामावर त्या असमाधानी दिसल्या मागासवर्गीय योजना राबवताना सहानुभूती व संवेदनशीलता ठेवा अशा शब्दात सूचना करताना सर्व योजनांची प्रचार प्रसिद्धी आवश्यक झाली पाहिजे अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना भरली…
या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला तसेच जात पडताळणी समिती कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतला यानंतर आठ दिवसांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग तसेच विविध आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.