जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णासाठी योग प्राणायाम शिबिर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जिल्हा नियोजन भवनात शनिवारी सकाळी योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांच्यासह महापौर श्रीकांचना यंनम, झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त धनराज पांडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, पतंजलीच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे, महापालिका नगर अभियंता संदीप कारंजे, नगरसेविका संगीता जाधव, संतोष दुधाळ, नितीन मोरे, मोहन कुंभार, सुजाता शास्त्री, यांच्या उपस्थितीत ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले.
यावेळी स्वामी रामदेव म्हणाले, आज दोन स्वामींचा योग जुळून आला आहे एकाच्या नावापुढे स्वामी आहे तर दुसऱ्यांच्या नावानंतर स्वामी आहे, त्यामुळे निश्चितच सोलापुर कोरोनामुक्त होईल. आपले शरीर कमजोर आहे मात्र मनोबल आणि आत्मबल व्यवस्थित असल्यास कोणताही रोग आपोआप ठीक होतो, त्यामुळे तुम्ही स्वतः ‘पॉझिटिव’ रहा कोरूना निश्चित ‘निगेटिव्ह’ होईल असे सांगताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी विनंती करेन की संपूर्ण महाराष्ट्रामधील कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करावे.
स्वामी रामदेव यांनी सोलापूरकराना दिला हा सल्ला….
रोज तुळशी आणि गुळवेल यांचा काढा घ्या.., तसेच रोज सफरचंद, पपई आणि डाळिंब या फळांचे सेवन करा…
सीईओ दिलीप स्वामी यांनी या आयोजन मागील उद्देश स्पष्ट करताना सोलापूर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर मध्ये सात हजार रुग्ण उपचार घेत आहेत मात्र मानसिक तणावाखाली राहिल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे हा मानसिक तणाव कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ताणतणाव मुक्त शिबिराचे आयोजन आम्ही केले आहे, करो योग रहो निरोग हा उद्देश ठेवून आपल्या पतंजली योग समितीच्या माध्यमातून आजपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर मधील उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन केले आहे त्यासाठी आपलं मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
यावेळी महापौर श्री कांचना यन्नम तसेच उपायुक्त धनराज पांडे यांनी सुद्धा आपले विचार मांडताना हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप कारंजे यांनी केले प्रारंभी प्रास्ताविक मध्ये सुधा अळळीमोरे यांनी शिबिर घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली.


















