सोलापूर – शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मलिक कोंडीबा हब्बु यांची सोलापूर शिवसेना उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज , शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ते अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत.शिवसेनेचे निष्ठावंत कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.
शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण , विद्यार्थी सेना नेते महेश धारशिवकर , लहू गायकवाड , शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत उपशहर प्रमुख पदी मलिक हब्बू यांची निवड केली आहे.
शिवसेनेच्या उन्नतीसाठी पक्षवाढीसाठी येणाऱ्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन असा विश्वास हब्बू यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला आहे.



















