मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणारा आष्टी बंधारा कोरडा पडल्याने नागरिकांचे पाण्याअभावी हाल होऊ नये म्हणून शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक सीमा पाटील यांनी मोहोळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना टँकर सुरु करण्यासाठी पत्र दिले आहे.
मोहोळ शहरास होत असलेल्या पाणीपुरवठा आष्टी बंधारा पाण्याअभावी कोरडा पडला आहे. गेला महिनाभर अनेक उपाययोजना करुनही शहरास सलग पाणीपुरवठा होऊ शकला नाही. शहराची लोकसंख्या ५०,००० च्या वर असून पाण्याअभावी शहरातील नागरिकांचे व माता भगिनींचे हाल होत आहेत. मान्सून ही लांबणीवर पडल्याने शहरातील अनेकांचे बोअरवेल कोरडे पडल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत त्यामुळे तातडीने १७ टँकरची तहसिलदार मोहोळ यांच्याकडे मागणी करावी व सर्व टँकरचे पाणी विजापूर रोड पाणी टाकीमध्ये एकत्र करुन रोटेशनप्रमाणे शहरातील सर्व प्रभागांमध्ये नागरिकांना समान पाणी देण्यात यावे तसेच शासनाकडे पाटबंधारे विभागास बंधाऱ्यामध्ये पाटबंधारे विभागास पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.


















