मोहोळ नगरपरिषदेने मैला प्रक्रिया केंद्राच्या बांधकामाचे काम सुरू केले होते, त्यांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, , जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, , मुख्याधिकारी एन के पाटील, नगराध्यक्षा शाहीन शेख यांनी केली, 31 डिसेंबर 2019 रोजी कामाची सुरुवात करण्यात आली होती कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत काम पूर्ण करणे बंधनकारक असताना मुदतीत काम पूर्ण झाले नाही एवढेच नाही तर स्थापत्य अभियंता अक्षय अक्रूर खटके याने संबंधित ठेकेदाराला कामाचे बिल अदा केले आहे राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार मुदतीत काम पूर्ण न करणे, आवश्यक असताना कार्य तत्परता दाखवली गेली त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आपल्या कर्तव्यात कसूर व कामात निष्काळजीपणा केल्याने स्थापत्य अभियंता अक्षय खटके यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासकीय सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश 21 जानेवारी रोजी निर्गमित केले जिल्हा प्रशासन अधिकारी डॉक्टर पंकज जावळे यांनी स्थापत्य अभियंता खटके यांना निलंबित केल्याचा आदेश शुक्रवार 22 जानेवारी रोजी काढला आहे.