मोहोळ तालुक्यात झालेल्या 76 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली लोकशक्ती परिवाराने मोठे यश संपादन केलं मंगळवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडीमध्ये तालुक्यातील तब्बल 28 ग्रामपंचायतींवर लोकशक्ती परिवाराने सत्ता काबीज केली आहे त्यामध्ये शेटफळ, अर्जुनसोंड, कोथाळे, आष्टी, औंढि, शिरापूर , पापरी, देवडी, येवती, नजीक पिंपरी, परमेश्वरपिंपरी, कोरवली, रामहिंगनी नादगाव, पाटकूल, ढोकबाभूळगाव,पिरताकळी, वटवटे, मुंढेवाडी,भांबेवाडी, ,शेजबाभूळगाव, सिद्धेवाडी, सय्यद वरवडे, खंडाळी, थलमवाडी, खवणी, कोळेगाव, तेलंगवाडी, या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच हे लोकशक्ती परिवाराचे झाले आहेत, शेटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी झुंबर वागज तर उपसरपंच पदी दत्तात्रेय उद्धव वागज यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर शेटफळ ग्रामपंचायतीसमोर लोकशक्ती परिवाराचे नेते अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या उपस्थितीत गुलालाची मुक्त उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष करण्यात आला..