सोलापूर : मोहोळ तालुक्यातील आष्टे या गावाला जाणारा रस्ता खराब झाल्यामुळे दुरुस्तीच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या समोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येऊन लक्ष वेधण्यात आले. सेनेचे तालुका अध्यक्ष लखन घाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
घाटे म्हणाले, मौजे आष्टे, ता. मोहोळ, जि. सोलापूर हे गांव सोलापूर-पुणे नॅशनल हायवे पासुन ७ कि.मी. अंतरावर आहे. आष्टे गांवातुन भांबेवाडी, हिंगणी व इतर तीन गावाला जाणारा रस्ता आहे. आष्टे गांवाला जाणारा रस्ता १५ वर्षापुर्वी केला होता. आष्टे हे गांव चार ते पाच हजार लोकसंख्या असलेले गांव आहे. आष्टे हे गांव नदीकाटचे गांव आहे. त्यामुळे गांवात ऊस वाहतुक मोठया प्रमाणात असते. त्यामुळे रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यात एक ते दिड फुटाचे खड्डे पडलेले आहेत. या खड्यात पडून अनेक नागरीक जखमी झालेले आहेत. आष्टे या गांवातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था यांनी आंदोलने देखील केले आहेत. या पूर्वी देखील आम्ही निवेदन दिले होते. परंतु संबंधित अधिकाऱ्याने आम्हास आज पर्यन्त खोटे आश्वासन दिले गेले, शेवटी आज आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


















