मोहोळ : दिनांक २२/१०/२०२१ पासून १००/- रुपये स्टॅम्प वापरण्यास तहसिल कार्यालयात बंदी करण्यात आलेली आहे. याव्दारे आपणास कळविणेत येते की शासकीय कार्यालयात विविध योजनेसाठी अर्ज सादर करताना त्यामध्ये स्वयंघोषणापत्र १००/- स्टॅम्पवर घेतले जात होते. त्यामुळे जनतेच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे दिसून आल्यानंतर ती गैरसोय दूर करण्यासाठी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र.७१/१८-अ दिनांक ९ मार्च २०१५ नुसार कोणत्याही कामासाठी १००/- स्टॅम्पची आवश्यकता भासणार नाही त्यामध्ये पुढील प्रमाणे नमुद गेलेल्या योजनंचा समाविष्ट आहे. १ मा लोकप्रतिनीधी सुचविलेल्या गावातंर्गत मुलभूत सुविधा शासन निर्णय क्र. विकास-२०१५/प्र.क्र. ५२/ योजना-६, दिनांक २७ मार्च २०१५ अन्वये विहीत केलेले आहे. २ जन्म नोंदणी व प्रमाणपत्र ३ मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र ४. रहिवास दाखला व प्रमाणपत्र ५. विवाहाचा दाखला ६. नोकरी व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र ७ मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र ८ मालमत्ता फेर फार प्रमाणपत्र प्रत ९ नादेय प्रमाणपत्र १०, बेरोजगार प्रमाणपत्र १९. हयातीचा दाखला १२. शौचालय दाखला १३ जॉब कार्ड १४. बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र १५ नळ जोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र १६ चारित्र्य दाखला १७ निराधार योजनेसाठी वयाचा दाखला १८. दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र १९ विजेच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र २०. जिल्हा परिषद सेस फंडातून कृषी साहित्य खरेदी २९ राष्ट्रीय बायोगस व खत व्यवस्थापन कार्यक्रम २२ बचत गटांना खेळते भांडवल बँकेमार्फत कर्ज पुरवटा २३ कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र वरील योजनाकरीता अर्ज करताना स्वयघोषणापत्र व प्रतिज्ञापत्र सादर करताना १००/- रुपये स्टॅम्पची आवश्यकता असणार नाही. तरी १०० रुपये स्टॅम्पची तहसिल कार्यालयात मागणी केल्यास नायब तहसिलदार यांचेशी संपर्क साधवा.
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

















