“झेडपी माळशिरसच्या त्या सहा सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना मागणीचा अर्ज दिला असून 14 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे”
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीप बजावूनही माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल देवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या सहा सदस्यांनी विरोधात मतदान केले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला या सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर दुपारी साडेबारा वाजता सुनावणी होती यावेळी तक्रारदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे व त्यांच्या वतीने एडवोकेट उमेश मराठे, एडवोकेट इंद्रजीत पाटील, एडवोकेट बाबासाहेब जाधव हे हजर होते, सुनावणीसाठी स्वरुपाराणी मोहिते पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील हे पाच सदस्य आपले वकील एडवोकेट दत्तात्रय घोडके, एडवोकेट अभिजीत कुलकर्णी, एडवोकेट नितीन खराडे यांनी हजेरी लावली. शितलादेवी मोहिते-पाटील या मात्र आज गैरहजर होत्या.
तब्बल एक तास भर सुनावणी झाली सुनावणी नंतर 14 जुलै रोजी पुढील तारीख देण्यात आली आहे. दरम्यान अर्जदार साठे यांचे वकील एडवोकेट मराठे यांनी माहिती दिली, मोहिते पाटील गटाने दोन अर्ज दिले आहेत, तसेच तक्रारदार यांच्यावतीने 1 अर्ज दाखल करण्यात आला, त्यामध्ये त्यांनी एका अर्जात राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेची मागणी केली तसेच पहिल्या अर्जात हायकोर्टाच्या आदेशानुसार प्राथमिक मुद्दा काढावा, याचिका दाखल करताना जे कागदपत्रे सादर केले नाहीत,पुरावे नाहीत त्यावर पूर्ण चौकशी न करता प्राथमिक मुद्द्यावरच पिटीशन डिसमिस करावा अशा मागणीचा दुसरा अर्ज मोहिते पाटील गटाने दिला आहे, ऍड मराठे यांनी दिलेल्या अर्जात या प्रकरणात तोंडी पुरावा जो आहे तो अगोदर सहा सदस्यांचा देण्यात यावा नंतर तक्रारदार यांना संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर येत्या 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.




















