सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर समन्वयक शेखर माने हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यांनी दुपारी शासकीय विश्रामगृहावर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे सर्व नेत्यांची बैठक शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या सुभद्राई मंगल कार्यालयात घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांनी महेश कोठे यांच्यावर जबाबदारी दिली असल्याने राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने प्रभाग रचनेवरून वाद घालण्यास सुरुवात केली त्यांनी थेट महेश कोठे यांनाच लक्ष्य केले वाद इतका वाढला की महेश कोठे यांच्या छातीत दुखू लागले त्यानंतर लगेच महेश कोठे यांना तिथून मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती कळताच राष्ट्रवादीचे सर्व नेते मार्कंडेय हॉस्पिटल कडे पण आले असल्याची माहिती समोर आली आहे. नक्की सुभद्राई मंगल कार्यालयात काय घडले, महेश कोठे यांच्या सोबत वाद घालणारा नगरसेवक कोण होता याची माहिती थोड्याच वेळात सविस्तरपणे समोर येणार आहे.















