सोलापूर शहरासह पंढरपूर परिसरात शनिवारी रात्री 11:57 च्या सुमारास भूकंप झाल्याची चर्चा होत आहे. भूकंपाची तीव्रता सोलापुरात जाणवली नाही मात्र सात रस्ता परिसरातील कृष्णा अपार्टमेंट मध्ये अनेकांना हा भूकंप जाणवल्याचे समजते. भूकंपाचा केंद्रबिंदू हे कर्नाटक राज्यातील विजयपूर हे असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर याची माहिती नाही मात्र राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत ट्विटर वेबसाईटवर कोल्हापूर मध्ये भूकंप झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे त्यांची तीव्रता ही 3.9 होती.
त्या ट्विटरवर विजयपूर मध्ये मोठा भूकंप झाला आहे असे सायनदीप दास यांनी ट्विट केले आहे.
सोलापूर शहरात शनिवारी रात्री भूकंप झाल्याची बातमी एका मोठ्या दैनिकाच्या ऑनलाइन वर प्रसारित झाली आहे. संकेतस्थळावरील पेज व्हायरल होत असून त्यामध्ये भूकंपाची वेळ रात्री 11 वाजून 57 मिनिटांची होती, तीव्रता सुमारे 4 एवढी असल्याचे वृत्त आहे, किमान 10 किलोमीटर अंतरावर 4 ची तीव्रता होती असे दाखवण्यात आले आहे.
विजयपूर सह भूकंपाचे धक्के हे कर्नाटकातील इंडी, अफजलपूर, सिंदगी, सोलापूर, पंढरपूर या भागात बसल्याचे वृत्त आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. रात्री उशिरा धक्के बसल्याने आता रविवारी दिवसभर याची माहिती घेतली जाईल, कुठे काही पडझड झाल्याचे वृत्त नाही.
केद्रस्थानी स्थानिक वेळ: शनिवार, 4 सप्टेंबर, 2021 11:57 दुपारी (GMT +5: 30) मोठेपणा: 4? खोली: 10.0 किमी केंद्रबिंदू अक्षांश / रेखांश: 17.3738 ° N / 75.83893 ° E (विजयपुरा, कर्नाटक, भारत) अँटीपोड: 17.374 ° S / 104.161 ° W जवळपासची शहरे आणि शहरे: 25 किमी (16 मैल) NNW ऑफ इंडी (पॉप: 34,100) -> जवळचे भूकंप पहा! सोलापूर (महाराष्ट्र) चे 34 किमी (21 मैल) SSW (पॉप: 997,300) -> जवळचे भूकंप पहा! अफझलपूरचे 59 किमी (36 मैल) WNW (पॉप: 20,100) -> जवळचे भूकंप पहा! विजापूरचे 63 किमी (39 मैल) NNE (पॉप: 271,100) -> पहा जवळचे भूकंप! पंढरपूर (महाराष्ट्र) चे 64 किमी (40 मैल) ईएसई (पॉप: 95,700) -> जवळचे भूकंप पहा! 66 किमी (41 मैल) NW सिंधगी (पॉप: 33,800) -> पहा जवळचे भूकंप!






















