सोलापूर ; जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर दौर्यावर आले असताना त्यांना दहावी व बारावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी पालकमंत्री भरणे यांनी त्वरित समोर उभे असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांना बोलावून घेतले
त्यांना तातडीच्या सूचना करत कोणत्याही परिस्थितीत दहावी आणि बारावी शाळा व कॉलेजचे वर्ग तसेच इतर क्लासेस बंद करता कामा नये,
जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका विद्यार्थी कोरोनाची काळजी घेण्यास सक्षम आहेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या…..पहा काय म्हणाले पालकमंत्री

















