सोलापूर ! सांगोला तालुक्यातील महुद रोड वाकी या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून दोन गाड्या जप्त करत सुमारे साडे 28 लाखाचा गुटखा जप्त केला त्याचबरोबर दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आले आहेत.
प्रवीण दत्तात्रय खांडेकर, चेतन दत्तात्रय खांडेकर, बाबू धुळा काळे वय 32 वर्षे रा – खैरने ता. जत जिल्हा सांगली या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सांगोला पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री व सोमवारी पहाटे शांत झालेल्या कारवाईत महिंद्रा पिकअप MH-12 LT- 4328 या वाहनातून पान मसाला व सुगंधित सुपारीचा एकूण मिळून 15,13,120/-रु.किमतीचा चा साठा व वाहन अंदाजे 500000/-रु असा एकूण 20,13,120/- रुपयांचा मुद्देमालजप्त करण्यात आला.
व अशोक लेलँड दोस्त MH-12 SX- 1240 या वाहनातून पान मसाला व सुगंधित सुपारीचा एकूण मिळून 13,24,240/-रु.किमतीचा चा साठा व वाहन अंदाजे 500000/-रु असा एकूण 18,24,240/- मुद्देमाल जप्त करण्यात आला
ही कारवाई आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य व एस.एस.देसाई, सह आयुक्त,पुणे विभाग, अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक आयुक्त (अन्न ) प्रदीपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनखाली उमेश भुसे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पार पाडली.



















