सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं ख्रिसमस निमित्त ख्रिस्ती बांधवांचा सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
शनिवारी ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ हा उत्साहात आणि धार्मिक परंपरेनुसार साजरा करण्यात आला विविध चर्च मधून प्रार्थना आणि धार्मिक संदेश देण्यात आले सर्वत्र चैतन्यमय असं वातावरण होतं.
दरम्यान जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनी अर्थात ख्रिसमसच्या निमित्तानं एकतेचं दर्शन देखील घडलं मोदी मसीहा चौक येथिल मेथोडिस चर्च येथे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं धर्मगुरूंसह ख्रिस्ती बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसच त्यांना नाताळ निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या चर्च मधील प्रार्थना होताच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख,शहर अध्यक्ष मतीन बागवान यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पास्टर रेव्हरंड सुंदरराज यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या याच वेळी समाजसेवक जॉन फुलारे ,श्रीदेवी फुलारे यांचा देखील छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं यथोचित असा सत्कार करण्यात येऊन त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या प्रार्थनेसाठी आलेल्या बांधवाना गुलाब पुष्प देऊन त्यांना नाताळच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना मतीन बागवान यांनी जॉन फुलारे आणि नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचं कार्य हे सर्व समाज घटकांना न्याय देणारं आहे असा उल्लेख करत आज नाताळ निमित्त शुभेच्छा देताना विशेष आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली
दरम्यान धर्मगुरू यांनी प्रत्येक सण उत्सव आम्हाला बंधुभाव जपण्याची शिकवण देत असतात अशी भावना व्यक्त केली
समाजसेवक जॉन फुलारे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडने नाताळ निमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या यातून सामाजिक एकतेच दर्शन घडत असल्याचं म्हटलं.
नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुस्लिम बांधवांच्या शुभेच्छांमुळ नाताळचा आनंद द्विगुणित झाल्याचं मनोगत व्यक्त केलं बेंजामिन बलगेरी , संपतकुमार जगले ,जेम्स जगले , यांच्या सह मेथोडिस् चर्चचे पधादिकारी उपस्थित होते


















