देशात आपात्कालीन परिस्थितीत दोन कोरोना लस वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड यांना रविवारी भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात कोरोना संसर्गात आघाडीवर काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना ही लस दिली जाईल, सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या 30 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना या लसी देण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना विषयक सल्लागार माजी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर हे कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना याची माहिती घेण्यासाठी बुधवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्यासोबत राज्याचे माजी आरोग्य संचालक साळुंखे हे असणार आहेत, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह आरोग्य विभाग पोलीस प्रशासन यांची बैठक पार पडली दीपक म्हैसेकर हे सोलापूर शहर व जिल्ह्यातील 30000 आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसी देण्याबाबत कशा पद्धतीने सोलापूर प्रशासनाने नियोजन व उपाय योजना केली आहे याची माहिती घेणार आहेत त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे