सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या तब्बल 500 वाहनांचा ताफा अखेर सोलापूर मध्ये दाखल झाला आहे. त्यांचे मार्केट यार्ड चौकात सोलापूरकरांनी गुलाबाच्या पाकळ्याची उधळण करून जल्लोषात स्वागत केले. ते सध्या हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी थांबले आहेत. के चंद्रशेखर राव हे मंगळवारी पंढरपुरात आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात अनेक राजकीय नेते बी आर एस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

















