आज प्रतापगडावर आयोजित शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली आहे. छत्रपती शिवराय हे तमाम देशातील जनतेचे आराध्य दैवत आहे,असे असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून छत्रपतींबाबत अवमानकारक विधाने करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.
ही बाब अत्यंत क्लेशदायक व तितकीच चिड आणणारी आहे. आमचे आराध्य दैवत असणार्या शिवरायांचा इतिहास हा पराक्रमाचा आहे पळपुटेपणाचा नाही, एखाद्या राजकारण्याची तुलना छत्रपतींबरोबर करून लोढा यांनी तमाम जनतेचा अवमान केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी अशा वाचाळ मंत्री मंगलप्रभात लोढांना तात्काळ मंत्रीमंडळातुन पायउतार करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केली.
दरम्यान लोढा यांचे काय होते वक्तव्य वाचा…
आज 363 वा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिंदे व्यासपीठावर मंगलप्रभात लोढा यांनी बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले.