काँग्रेस नेते माजी महापौर आरिफ शेख यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या रामवाडी युपीएचसी केंद्रात जाऊन कोरोनाची लस घेतली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लसीकरण किती महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येकांना झाली आहे.
त्यामुळे सध्या 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांना लसीकरण सुरू आहे माजी महापौर आरिफ शेख यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर सर्व नागरिकांना आवाहन केले आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी पुढील धोके टाळण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे, लस घेतली तर स्वतःबरोबर आपलं कुटुंब ही सुरक्षित राहिल मी लस घेतली तुम्हीही घ्या असे अरिफ शेख म्हणाले.

















