स्वतःला लिंगायत समाजाचा धर्मगुरू मानणारे, कुणालाही अंगाला शिवून न घेणारे, गुरुवारी मूक राहणारे, भगवे वस्त्र परिधान करून फिरणारे मठाधिपती डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी महाराज हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कधी अनुसूचित जाती प्रवर्गातील बेडा जंगम या जातीचे झाले हे कुणालाही कळाले नाही,
त्यांनी लोकसभेचा अर्ज भरला मात्र याच वेळी रिपाइं नेते प्रमोद गायकवाड, पत्रकार मिलिंद मुळे तसेच विठ्ठल व्हनमोरे यांनी महाराजांचा दाखला बोगस असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मात्र त्या वेळचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या विषयात धाडस दाखवले नाही आणि महाराज खासदार झाले, शेवटी महाराजांचा दाखला हा बनावट असल्याचा निर्णय सोलापुरातील जातपडताळणी समितीने दिला त्यानंतर ते प्रकरण उजेडात आले ते सर्वांना धक्का देणारे होते या मागचे खरे मास्टरमाइंड हे अक्कलकोट तालुक्यातील तडवळ गावचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शिवसिद्ध बुळ्ळा हे निघाले,
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसिद्ध बुळ्ळा याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप पाहून पोलिस प्रशासनही थक्क झाले होते, त्याच्या सोलापुरातील दोन आणि अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील एका घरात शोध घेण्यात आला. यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली .
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घर झडतीत सापडलेल्या कागदपत्रातून नवनवीन खुलासे झाले. आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरात आढळलेल्या एका कागदपत्राद्वारे 2015 च्या प्रकरणात देखील त्याला आरोपी करण्यात आले तर बुळ्ळाच्या घरात सापडलेल्या तीन दाखल्यांची नोंद ही तहसील कार्यालयाकडे नव्हती, त्यामुळे आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याने असे किती दाखले तयार केलेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता, त्यांना अटक झाली,
अक्कलकोट तालुक्यातील तसेच सोलापूर शहरातील अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले त्यामध्ये काही आमदार, काही माजी आमदार, मध्यवर्ती बँकेचे संचालक, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, अनेक सरपंच यांचा समावेश होता, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला दरम्यान तब्येत बिघाड झाल्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले, तेव्हा अनेकांनी बुळ्ळा यांची सिव्हीलमध्ये भेट घेऊन नाव न घेण्याचा शब्द घेतल्याचे सांगण्यात आले,
सोलापुरातील न्यायालयाने वारंवार जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर उच्च न्यायालयातून बुळ्ळा यांना जामिनावर सुटका करण्यात आली काही दिवस विजनवासात घालवल्यानंतर आता बुळ्ळा हे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे चित्र आहे, त्यांनी आपल्या जुन्या राजकीय मित्रांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे सध्या ते जिल्हा परिषदेत सुद्धा वावरताना दिसत आहेत राजकीय वर्तुळात वादग्रस्त ठरलेला हा ज्येष्ठ कार्यकर्ता अनेकांच्या अडचणीचे कारण झालेला असला तरी अनेकांना मोठमोठी पदे मिळवून देण्याची त्यांचा सिंहाचा वाटा आहे.



















