देविदास बाळासाहेब कावळे वय 43, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार ,माळशिरस नगरपंचायत असे लाच स्वीकारताना ताब्यात घेतलेल्या अधिकार्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे खाजगी कंत्राटदार असुन माळशिरस नगरपंचायत, माळशिरस अंतर्गत सार्वजनिक रस्त्याच्या निविदा निघालेल्या होत्या. त्यामध्ये सिमेंट कॉक्रीटीकरण रस्ता व त्यालगतच्या गटारी बांधकाम करणे यांची निविदा अंदाजे माहे एप्रिल २०२१ मध्ये निघाली होती. सदर निविदा मंजूर झालेले निविदा धारक यांचेसोबत सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून यातील तक्रारदार यांनी करार करन रस्त्याचे गटारीचे बांधकाम पूर्ण केले होते. सदर केले कामाचे बील मंजूर करुन घेणेसाठी तक्रारदार हे माळशिरस नगरपंचायत, माळशिरस येथील कार्यालयात पाठपुरावा करीत होते. तरी यांनी करारानुसार पूर्ण केलेल्या कामाचे बिल मंजुरीच्या अनुषंगाने तक्रारदार यांचे कामाचे मोजमाप | करुन त्याबाबत बिल मंजुरीसाठी अहवाल मुख्याधिकारी यांना पाठविण्याकरीता तसेच बिल मंजूर होवुन देणेकरीता यातील कावळे यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम रु १ लाख लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७०,०००/- रुपये लाच मागणी करून, पहिला हप्ता ३०,०००/- रुपये लाचेची रक्कम नगरपंचायत कार्यालय माळशिरसचे प्रशासकिय इमारतीमध्ये स्विकारली असता यातील लोकसेवक | | यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी लोकसेवक यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई सोलापूर लाचलुचपत विभागाचे पोलिस उपाधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे,पोलीस अंमलदार प्रमोद मकाले, स्वप्निल सन्नके एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पडली.


















