Wednesday, March 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माझे दुकान, माझी जबाबदारी ; सीईओ दिलीप स्वामी यांची नवीन संकल्पना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 March 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये नव्या संकल्पना तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आणखी एक नवीन संकल्पना समोर आणली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर ” माझे गाव, कोरोनामुक्त गाव ” अभियानांतर्गत ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणात कामकाज सुरु आहे.  प्रचार, प्रसिध्दी व जनजागृतीच्या माध्यमातून कोरोना चाचणी  संपर्क तपासणी चे काम मोठ्या प्रमाणात होत आहेत.  मास्क न लावणाऱ्या नागरिकांना दंड करुन त्यांना मास्क लावण्याचे बंधन करण्यात येत आहे.   त्रि-सूत्रीच्या पालनासाठी ग्रामपंचायत स्तरावर आग्रह धरला जात आहे.

असे असले तरी दुकानदार, पीठ चक्कीवाले, हातगाडीवाले इत्यादी लोक जे कोरोनाच्या प्रसारामध्ये उच्च प्रसारक आहेत ते कोरोनाच्या फैलाव थांबविण्याच्या कार्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नाहीत.  दुकानदार व तत्सम  व्यक्ती हे ग्रामसेवक , स्थानिक पातळीवरील कर्मचारी यांना प्रतिसाद देत नाहीत.  याऊलट कर्मचारी यांना दमदाटी करीत आहेत.  खरेदी-विक्री जास्त प्रमाणात व्हावी म्हणून आरोग्याची काळजी न करता ग्राहकांची प्रचंड गर्दी दुकानात करीत आहेत, होऊ देत आहेत.

बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना कटू प्रसंगालाही सामोरे जावे लागत असल्याचे ‍निदर्शनास आले आहे.  त्यामुळे अशा सर्व दुकानदार, चक्कीवाले, पानटपरी, केशकर्तनालये, सराफा दुकाने अशा सर्व प्रकारच्या आस्थापनेसाठी त्यांची जबाबदारी अधोरेखित करुन स्वत:हूनच त्रि-सूत्रीचे पालन करण्याबाबत जागृत करण्यासाठी ” माझे दुकान, माझी जबाबदारी ” हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात येत आहे.


माझे दुकान, माझी जबाबदारी ” या अभियानात प्रत्येक दुकानदाराने पाळावयाची दशसूत्रे अशी आहेत…….


 1)  प्रत्येक दुकानदार / आस्थापना धारकांनी कोरोना नियंत्रणाचे सर्व नियम स्वत:हून स्वत:ची जबाबदारी म्हणून पाळावे.


2)     मास्कविना प्रवेशास मनाई (No Mask, No Entry) चा फलक दर्शनी भागात मोठ्या कक्षरात लावावे.


3)     दुकानात बसणाऱ्या मालक, नोकर, मजूर इत्यादींनी मास्क घालणे बंधनकारक आहे.


4)   दुकानात येणाऱ्या ग्राहकांनासुध्दा मास्क, रुमाल बांधून आल्याशिवाय दुकानात प्रवेश नाकारावे.


5)    दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घेणे.  दुकानाचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन त्यानुसार 4/5 ग्राहकांनाच प्रवेश देणे, इतरांना नंतरची वेळ देणे.


6)     जास्त विक्री / नफा होण्याचे धोरण अवलंबण्यापेक्षा स्वत:चे आरोग्य, स्वत:चा जीव अतिशय महत्त्वाचा आहे याची जाणीव ठेवणे व त्याप्रमाणे सर्व खबरदारी / उपाययोजना अंमलात आणणे.


7)    प्रशासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या वेळेचे पालन करणे, स्वत: दुकानातील इतर नोकरांची चाचणी (Testing) करुन घेणे व चाचणी करणाऱ्यास सहकार्य करणे.


8)    दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण व पाणी ठेवणे व त्याचा नियमित वापर करण्यास प्रवृत्त करणे.


9)     दुकानदाराने स्वयंस्फूर्तपणे मास्कचा वाटप आपल्या दुकारात येणाऱ्या ग्राहकांना करणे, तसेच संपर्क, शोध (Contact, tracing) घेण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकारी / कर्मचारी यांना मदत करणे.


10) दुकानातील वस्तू सॅनिटायझर  करुन ग्राहकांना देणे, केशकर्तनालयासारख्या सेवा देणाऱ्या व्यक्तीने संपूर्ण साहित्य हे प्रत्येकवेळी पूर्णपणे सॅनिटायझर करुन वापरणे.


दुकानदार म्हणून माझ्या ग्राहकाची व स्वत:ची काळजी घेणे हे प्रथम जबाबदारी असल्याचे सदैव लक्षात ठेवून त्यानुसार वर्तणूक ठेवणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या दशसूत्रीचा सदैव अंमलबजावणी सर्व लहान-मोठे दुकानदार, गाडीवाले, पानटपरी व तत्सम सर्व व्यापारीवर्गाने करावे असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी संयुक्तपणे ही जबाबदारी पार पाडावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल  समक्ष सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे-त्रिभुवन धाइंजे यांचे हस्तांदोलन ; पुढे काय घडले ……..

Next Post

“धवलदादा” काँग्रेसमध्ये सक्रिय कधी होणार? माने-देशमुखांनी केला ‘श्री गणेशा’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"धवलदादा" काँग्रेसमध्ये सक्रिय कधी होणार? माने-देशमुखांनी केला 'श्री गणेशा'

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970995
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group