सोलापूर : नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांचा कॉलिफोर्निया पब्लिकयुनिव्हर्सिटी कढुन डी लिट पदवी देऊन गौरविण्यात आले.
रामचंद्र जाधव यांनी आज पर्यंत शिक्षण व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल डी लिट पदवी गोवा येथील हॉटेल रैडीसन येथील दीक्षांत समारंभ कार्यक्रमात देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गव्हरमेंट ऑफ इंडियाचे अंडर जस्टीस डॉ सहदेव सिह, ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफ महाराष्ट्र अशोककुमार रनखांब, सोशल वर्कर व लेखिका डॉ पंकज इंगळे, साऊथ एशियन ऑफ सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटी मलावी डॉ परमार, डॉ रत्नाकर अहिरे( माजी प्राचार्य, डी एस आय न्युजीलंड हॉस्टेल मुंबई) आदींच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली.


















