भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते माजी नगर सेवक दत्तात्रय सखाराम उर्फ बंडु कुलकर्णी याचे शनिवारी दुपारी 3/30 च्या दरम्यान निधन झाले. शासकिय दवाखान्यात ते अगोदर कोविडने आजारी होते त्यातुन ते बरे झाले म्हणुन त्याना सामान्य वार्ड येथे हलवले होते गेली 4 दिवस त्यांच्या प्रकृतीत चढउतार सुरु होता, शेवटी मृत्युने त्यांना गाठले.
भाजपाचा प्रामाणिक व कष्टाळू कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख होती. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा भाग म्हणून त्यांच्या प्रभागातील प्रत्येक मतदांरापर्यन्त पोहचणारा नगरसेवक अशी पण त्यांची कार्यपध्दती होती . त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणुन काम पाहिले होते, ते स्थायी समिती सदस्य होते, ते भारतिय मजदुर संघाचे कार्यकर्ते होते सोलापूरात रिक्षा संघटना उभी करण्यात त्यांचा वाटा होता. अशा एका हरहुन्नरी, प्रामाणिक, स्पष्ट, परखड, बोलणारा अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी मूकली आहे.


















