Thursday, March 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे राजकीय पुनर्वसन ; ‘गोल्डन गँग’ ला दिला हा इशारा ; बगलेंनी जपले असेही ऋणानुबंध

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 May 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नेते, 85 वर्षीय माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची  बिनविरोध निवड झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकचं जल्लोष केला. 


अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं निर्विवाद आणि एक हाती सत्ता प्राप्त केल्यानंतर सर्वांचचं लक्ष हे अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीकडं लागून राहिलं होतं.


सभापती तसचं उपसभापती निवडीसाठी सोमवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती इथं निवडणूक निर्णय अधिकारी अमर झालटे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सभापती पदासाठी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं. सभापतीपदी दुसऱ्यांदा निवडून आले. यापुर्वी ते 1982 ते 1987 दरम्यान सभापती होते. उपसभापती पदासाठी अप्पासाहेब पाटील आणि कार्तिक पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यासाठी गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यात अप्पासाहेब पाटील यांना 12 तर कार्तिक पाटील यांना 6 मत पडल्यानं उपसभापतीपदी अप्पासाहेब पाटील यांची निवड घोषित करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकचं जल्लोष करत फटाक्यांची मुक्त आतषबाजी केली. 

या निवडी नंतर सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते नूतन सभापती सिद्रामप्पा पाटील तसचं उपसभापती अप्पासाहेब पाटील यांचा सर्व नूतन संचालक तसचं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील सत्कार करुन निवडी निमित्त शुभेच्छा दिल्या. 


यावेळी, शिवसेना माजी तालुकाप्रमुख सोपान निकते, अक्कलकोटचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपा नेते महेश हिंडोळे, श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन संजीवकुमार पाटील, यांच्यासह मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आप्पांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना खऱ्याअर्थानं निश्चितचं  बाजार समितीच्या माध्यमातून न्याय मिळेल आणि त्यांचा विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.


आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ही ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव करताना, अक्कलकोट आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होईल, शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास निश्चितचं सार्थ करुन दाखवू अशी ग्वाही दिली.


नूतन सभापती सिद्रामप्पा पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानताना गोल्डन गँगचे मनसुबे, त्यांचे कुटील डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडले. आगामी काळात देखील शेतकऱ्यांनी अशीचं साथ द्यावी असं आवाहन करत, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वशैलीचं त्यांनी मनापासून कौतुक केलं.

सुलेर जवळगे विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी चेअरमन रविकांत बगले यांच्यासह संचालका मंडळाकडून विशेष सत्कार घडून आणला. याप्रसंगी स्वामी समर्थ सूतगिरणीचे संचालक बसवराज बाके, नागया स्वामी, व्हन्नप्पा बिराजदार, राजकुमार बगले, पिरोजी शिंगाडे, मल्लिकार्जुन अष्टगे, माजी उपसरपंच श्रीमंत बगले, भरत देवकते, माजी चेअरमन सिद्धाराम बाके, निलेश बाके, संतोष बगले, गंगाधर बाके, नागनाथ राजुरे आदींची उपस्थिती होती. ऋणानुबंध आणि निष्ठा आप्पांच्या बाबतीत नेहमीच सदैव तत्पर राहील अशी भावना चेअरमन रविकांत बगले यांनी यावेळी व्यक्त केली.


यावेळी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती सातलिंगप्पा परमशेट्टी, उपसभापती सिध्दाराम बाके, अक्कलकोट तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष मोतीराम राठोड, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, श्री. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्या व्हाईस चेअरमन विश्वनाथ भरमशेट्टी, संचालक भरमनाथ भुताळी घोडके, तसचं महेश पाटील, दिलीप शावरी, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी, तसचं करजगी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन विवेकानंद उंबरजे, श्री. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक अशोक मुलगे तसचं विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सूत्रसंचालन मल्लिनाथ दुलंगे यांनी केलं.

SendShareTweetSend
Previous Post

भाजप नेते लक्ष्मणराव ढोबळे यांची काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर बोचरी टीका ; म्हणाले मर्सिडीजमध्ये बसून…….

Next Post

आमदार प्रणिती शिंदे भेटल्या जिल्हाधिकाऱ्यांना ; विचारला प्रश्न, टेंडर काढणार तर कधी काढणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदे भेटल्या जिल्हाधिकाऱ्यांना ; विचारला प्रश्न, टेंडर काढणार तर कधी काढणार

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971001
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group