राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नुकताच सोलापुर दौरा झाला. या दौऱ्यात खासदार शरद पवार यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्या निवास्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान सोलापुरातील अनेक नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. कोठे यांनी सोलापुरातील काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षात येणारे माजी महापौर यू एन बेरिया काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यासह राष्ट्रवादीचे स्थानिक बड्या नेत्यांना आमंत्रण दिले असतानाही या नेत्यांना कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी पोलिसांनी प्रवेश दिला नसल्याने नाराजी पसरली होती. या विषयी माजी महापौर महेश कोठे यांनी दिलगिरी व्यक्त केली.

















