सोलापुरातील एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे हे अन्नतृप्ती योजनेच्या माध्यमातून शेकडो वृद्ध निराधारांना डबा पुरवतात. या उपक्रमाचा त्यांनी अचानक आढावा घेतला, स्वतः घरोघरी जाऊन माहिती घेतली संवाद साधला. त्यानंतर त्यांनी आपले अनुभव कथन केले….
मी सोलापुरात कॉलेजला असताना गावाकडून शिदोरीत गवळीच्या हातात डब्बा यायचा. खूपचं हालाकीची परिस्थिती असल्याने अनेक अडचणींना आम्ही बालपणी सामोरे गेलो. कुठे तरी याचा जाणीव राहिली म्हणून एम.के.फाउंडेशनच्या वतीने अन्नतृप्ती योजनेच्या माध्यमातून गरीब, गरजू अश्या वृद्ध निराधारांना दररोज डब्बा पुरविला जातो.
जसा आज कंपनीच्या कामातून थोडा वेळ काढून आपण प्रत्यक्ष आमच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या आजी- आजोबांना डब्बा द्यावा असे मनात आले, आणि निराधारांना डब्बा देण्यास गेलो. डब्बा कधी येईल म्हणून डोळ्यात जीव आणून वाट पाहणाऱ्या आजी आजोबांच्या परिस्थितीची आणि तब्बेती विषयी माहिती घेतली, वस्तुस्थिती बघितल्यावर खूप भावुक झालो, माझे वाईट काळ मला आठवला. सर्व संकटातून मात करत इथवर पोहचून पाय जमिनीवर राहिलेत आणि अश्या लोकांच्या सेवा करण्याची क्षमता देव माझ्यात दिल्याचे अभिमान ही वाटला.
येणाऱ्या काळात फाउंडेशनच्या माध्यमातून अश्या निराधारांना मदतीचा हात देण्यात येईल. दुःखीत-वंचित लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर समाजसेवेचा घेतलेला वसा निरंतर चालू राहीलचं.

















