बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मानवी साखळी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात तातडीची बैठक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त कमिटीचे मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत बुधवार 1/11/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भीमसैनिकांच्या वतीने मराठा समाजानी आरक्षण संदर्भात ज्या मागण्या मांडलेल्या आहेत. या मागण्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सर्व भीमसैनिक यांच्या वतीने मानवी साखळी पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सोलापूरकरानी व भीम सैनीकांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली .