सोलापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले, त्यांच्या उपस्थितीत काँगेस कार्यकर्ते मन्सूर गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
गांधी हे मागील काही दिवसांपासून नाराज आणि काँगेस पासून लांब दिसून आले. भाजप प्रवेशाच्या चर्चा होत होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी भाजप युवा नेते मनिष देशमुख यांच्या समवेत वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागताला गेले होते. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता.
शुक्रवारी मन्सूर गांधी यांनी भाजप प्रवेश केला, आणि शनिवारी कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागत आहे, काँग्रेस पक्ष बहुमताच्या जवळ जात असल्याचे चित्र सकाळी होते, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात कार्यकर्ते जमू लागले होते, निकाल पाहता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
याचवेळी पत्रकारांना पाहत अनेक युवा नेत्यांनी मन्सूर यांचा विषय काढला, गांधी हे भारत जोडो यात्रेत कुठेही नव्हते, त्यांनी आता आमचे ‘गांधी’ नाव काढून ‘मोदी’ हे नाव ठेवावं अशी भाषा पुढे आली, काहीना प्रतिक्रिया घ्या म्हटल्यावर बोलण्यास नकार देत त्यांना आम्ही मोठं का करावं असे म्हणून आज फक्त कर्नाटक विजयाचा जल्लोष करू असे सांगितले.




















