मंद्रूप पोलीसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील जुनी टाकळी येथील चान्याबली दर्गाच्या शेजारील मैदानात काही इसम गोलाकार बसुन मन्ना नावाचा जुगार खेळत होते.घटनास्थळी काही लोक गोलाकार बसुन मन्ना नावाचा जुगार खेळत असताना दिसले.त्यांच्या मधोमध रोख रक्कम ही दिसुन आली.त्यांना गराडा घालून जागीच पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील 3 इसम पळुन गेले.महेश मल्लप्पा लाड, वय 27 वर्षे,रा.नविन टाकळी,ता.द.सोलापूर या आरोपीस ताब्यात घेतले.अशोक मसण्णा साबळे,वय वर्षे 45 वर्षे रजाक जाफर मुल्ला शेख,वय वर्षे 32,सुशिल गंगाधर झेंडकर,वय वर्षे 40, तिघे रा.जुनी टाकळी,ता.द.सोलापूर असे पळून गेलेल्या आरोपींची नांवे असल्याचे सापडलेल्या आरोपीने सांगीतले.
सापडलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात खालील प्रमाणे जुगाराचे साहित्य, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १० हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अंतर्गत कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे,पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आसादे,पोलीस शिपाई चौगुले,पोलीस शिपाई पाटील व पोलीस शिपाई कांबळे यांनी केली.
या गुन्ह्याचा अधिक तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पी.पी.आसादे हे करीत असल्याची माहिती मंद्रूप पोलीसांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली..