सोलापूरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डफरीन चौक परिसरात असलेले नर्मदा हॉस्पिटल चर्चेत आले ते एका कोविड पॉझिटिव्ह उपचार घेत असलेल्या पत्रकाराने स्वतःचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने. याठिकाणी व्यवस्थित उपचार केले जात नाहीत, पैसे उकळले जातात, अस्वच्छता आहे असे अनेक आरोप केले गेले, त्यावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली त्यानंतर नर्मदा हॉस्पिटलची चौकशी झाली मात्र या नंतर काहीही साध्य झाले नाही, नर्मदा हॉस्पिटल हे माजी आमदार दिलीप माने यांचे असल्याची चर्चा सोलापुरात आहे याच पार्श्वभूमीवर सरकारने सोलापुरात 1 ते 15 जून दरम्यान पुन्हा लॉकडाऊन लावले आहे, त्यामुळे व्यापारी वर्ग संतप्त आहे मंगळवारी व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली परंतु कोणताही निर्णय झाला नाही शेवटी बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनात चंदूभाई देढिया यांनी एक बेडवर प्रतीकात्मक सलाईन लावून आंदोलन केले, चंदूभाई देढिया यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ते बेड रिकामे होते तेव्हा दिलीप माने त्यावर जाऊन बसले आणि आडवे झाले, याच वेळी एका ज्येष्ठ पत्रकाराने झोपा झोपा निवांत खाट ‘नर्मदा’ चीच आहे असे म्हणताच माने यांनी पण नर्मदा हॉस्पिटल माझे कुठे आहे? असे उत्तर येताच त्या पत्रकारांनी घोषित करा असे सांगताच ज्यांना हे समजले त्यांना हसू आले. दिलीप माने यांना या खाटावर पाहून त्यांचे वडील ब्रह्मदेव दादा माने यांच्या एका आंदोलनाची आठवण झाल्याचं केतन शहा यांनी सांगितलं.
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...
















