सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघ निहाय कार्यकर्ता जनसंपर्क मोहीम सुरू आहे. त्यांनी या मोहिमेची सुरुवात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातून केली त्या मोहिमेचा तालुक्यातील समारोप दक्षिण सोलापूर तालुक्यातील केंद्रबिंदू असलेल्या मंद्रूप या मतदारसंघांमधून झाला.
यापूर्वी मंद्रूप गाव म्हटले की तत्कालीन तालुका अध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे यांचे नाव पुढे यायचं म्हेत्रे यांचा तेवढाच दबदबा होता, ते तालुक्याचे अध्यक्ष होते, पंचायत समितीचे सभापती होते मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण बघून त्यांनी नांगी टाकली आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मंद्रूप गाव तसे पाहिले तर तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून परिचित आहे प्रमुख नेताच भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची वानवा होती मात्र ही सर्व जबाबदारी त्यांचे पुतणे अनंत म्हेत्रे यांनी पेलली. सध्या अनंत म्हेत्रे यांच्याकडे दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद आहे. काँग्रेसच्या आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली अनंत म्हेत्रे हे काम करत आहेत.
जिल्हाध्यक्षांची कार्यकर्ता जनसंपर्क मोहीम मंद्रूप मध्ये होती अनंत म्हेत्रे यांनी स्वतःच्या ताकतीने ही मोहीम यशस्वी करून दाखवली, दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी गावानंतर काँग्रेसच्या बैठकीला युवकांची सर्वाधिक उपस्थिती ही मंद्रूप गावात होती. एकूणच युवकांचा हा उत्साह आणि वातावरण बघून जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हेसुद्धा भारावून गेले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत म्हेत्रे यांच्या जोडीला राहुल म्हेत्रे, अमोल खांडेकर,भीमा नंदूरे,अफजल शेख,प्रशांत काळे, ओगसिद्ध मायनाळे,ऋषी शिंगाडे,ओंकार म्हेत्रे, नागु मायनाळे, शब्बीर नदाफ, गेणू शेंडगे,राहुल भागवत,निंगप्पा म्हेत्रे, नागराज म्हेत्रे,अमोल बगले,काका ख्याडे,उमेश शिंगाडे,सचिन घाटे,महेश स्वामी,कैलास शेंडगे,साहिल बागवान,परसू कमळे,रियाज शेख, सुधाकर लोभे, पिंटू खरात, रियाज बागवान,ओंकार शेंडगे,आनंद थोरात ,अल्ताफ मुजावर, इन्नुस शेख,अक्षय चव्हाण, वैभव व्हरे, समर्थ जोडमोठे व दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.


















