सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूर मुलींसाठी सुरू केलेली सायकल बॅंक प्रेरणादायी आहे. ग्रामविकास विभाग मुलींसाठी सायकल बॅंक सुरू करणे साठी विशेष मोहिम हाती घेणार अशी माहिती ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात स्वच्छता दिंडीच्या समारोप समारंभा साठी आले असता पंढरपूर तालुक्यातील दहा मुलींना १० सायकल चे वाटप ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करणेत आले. या प्रसंगी ते सायकल वाटप कार्सक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, चाळीस गावचे आमदार मंगेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परिषदेने सायकल बॅंके सारखा नाविण्यपुर्ण उपक्रम राज्यास दिशा देणारा आहे. सिईओ दिलीप स्वामी यांनी शासनाचा निधी न वापरता स्वत लोकवर्गणी व अधिकारी व कर्मचारी व विविध संयांची मदत घेऊन जिल्ह्यात २८८० सायकलींचे वाटप केले आहे. हा नाविण्यपुर्ण उपक्रम मुलींच्या शिक्षणासांठी दिशा दर्शक आहे. या मुळे शाळे पासून दूर राहत असलेल्या २८८० मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. शिक्षणाच्या प्रवाहा पासून मुली दूर राहणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. सोलापूर जिल्हा परिषदेने सायकल बॅंकेचा उपक्रम राज्यातील मुलींसाठी कशा प्रकारे राबविता येईल याची काळजी ग्रामविकास विभाग घेत आहे. सिईओ दिलीप स्वामी यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
सिईओ दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाच्या सुरूवाती पासून ते आज गायक चा सायकल बॅके बरोबर विविध उपक्रमांचा माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना दिली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखिल हा सायकल बॅंकेचा उपक्रम समजावून सांगितला. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी नाळे, विस्तार अधिकारी लवटे यांनी सायकल बॅकेच्या वाटपा साठी परिश्रम घेतले.



















