.चंद्रनील सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्यावतीने चंद्रनील वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला असून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक बाबा मिस्त्री कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, गटनेते चेतन नरोटे, अलका राठोड, विनोद भोसले, अंबादास करगुळे, हेमा चिंचोळकर, शंकर चौगुले, तिरुपती परकीपंडला यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात आमदार प्रणिती शिंदे यांनी सुशील बंदपट्टे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले, सुशील यांची गरिबांसाठी धडपड आदर्शवत असून महिलांचे आरोग्य त्यांच्या रोजगारासाठी तो प्रयत्न करतो, त्यांनी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेचा गोरगरिबांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षावर टीका करताना प्रणिती शिंदे यांनी सावध भूमिका घेतली, स्थानिक नेत्यांवर टीका न करता केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला, आज गॅस 900 रुपये झाला महिला गप्प का आहेत, शहरात पाणी प्रश्न गंभीर आहे तरीही कुणी बोलत नाही, गॅस पाण्याचा झळ हा महिलांना बसतो, तुम्ही दोनवेळा भाजपला मतदान का केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, जर केला नसेल तर भाजप लोकांना भुल करून,कुल करतो नंतर फुलाला मतदान देण्यास भाग पाडतो आता मात्र हे चालणार नाही आम्ही ईव्हीएम पेक्षा शिक्क्यावर मतदान घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
मी कुणाच्या अध्यात-मध्यात नाही,दुसऱ्या मतदारसंघात येणार नाही, मीच उलट मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, असे म्हणते. तुम्ही कामे करत नाहीत म्हणून मी बोलते आता तर कुणाचे नाव सुद्धा घेणार नाही, कारण नाव घेतल्यास यांना खूप राग येतो असे म्हणून भाजप आमदारांना त्यांनी टार्गेट केले.
सुशील बंदपट्टे म्हणाले, सर्व धर्म समभावावर चालणारा, महिलांचा आदर करणारा पक्ष काँग्रेस असल्याने मी या पक्षात सहभागी झालो. देशाच्या प्रगतीत काँग्रेसचे योगदान मोठे आहे, देशाचा पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजप करतोय, त्यांना आपणास रोखायचे आहे, मागील दोन वर्षे आपण कोरोनाशी लढतोय, त्यासाठीच अँबुलन्स सुरू केली, भविष्यात कोरोना संसर्ग वाढला तर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वेळेवर पोहोचता यावे. शासकीय योजना राबविल्या जातात, पण त्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यासाठी चंद्रनील फाउंडेशनच्या वतीने माहिती पत्रक काढले तसेच विविध आजारासाठीचे मोफत उपचार देण्याऱ्या योजनांचे माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. गरजू महिलांना रोजगार मिळावा म्हणून बँकेशी टायप करून कर्ज उपलब्ध करुन देत आहोत, मी मुंगीच्या माध्यमातून प्रयत्न करतोय मला तुमच्या कडून हत्तीचे बळ द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली



















