Tuesday, February 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भुजल सर्वेक्षण व सोलापूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 August 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



सोलापूर – राज्याचा भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुल यांचेत सामंजस्य करार करणेत आला. यामुळे भुजल सर्वेक्षणातील संशोधनास मदत होणार असून  विद्यार्थ्यांच्या कौशल्यास चालना मिळणार असल्याची माहिती राज्याच्या भुजल सर्वेक्षण विभाग व विकास यंत्रणा विभागाचे आयुक्त डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. 



सोलापूर येथील भुजल सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात आज आयुक्त डाॅ. कलशेट्टी व अहिल्यादेवी होळकर विद्यापाठाचे  कुलसचिव डाॅ. व्ही. बी घुटे  यांचेत पाच वर्षाच्या सामंजस्य करारावर सह्या झाल्या. या प्रसंगी या सामंजस्य करारावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलातील  डॉ. विनायक धुळप, डॉ. धवल कुलकर्णी, श्री. सुयोग बाविस्कर, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, सहायक भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तांत्रिक अधिकारी व्ही.डी.जाधव, कनिष्ठ अभियंता गुरुसिद्ध नारायणकर, सर्वेक्षक दीपचंद चंदनशिवे, भौ.मा.प्र.स. श्रीशैल बबलेश्वर, समाज विकास व क्षमता बांधणी तज्ञ सचिन झिंजाडे, कृषी तज्ञ गणेश शिंदे, जलसंधारण तज्ञ रणजीत गायकवाड व समन्वयक गणेश घाडगे आदी उपस्थित होते.



राज्य शासनाचा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरशी सामंजस्य करार देशातील नावाजलेली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांचे मध्ये भूजल क्षेत्रातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना संशोधनातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी पुढील पाच वर्षासाठी सामंजस्य करार झाला. या करारानंतर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या तंत्रज्ञान, क्षेत्रीय अभ्यास यांची माहिती मिळण्यासह भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये अनुभवाची संधी ही मिळणार आहे. तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला सोलापूर विद्यापीठातील तज्ञांकडून संशोधनामध्ये तसेच संयुक्तरित्या प्रकल्प राबविण्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रगत संसाधन, साधन यांचा उपयोग करता येणार आहे. 



या प्रसंगी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (भा.प्र.से) म्हणाले, भूजलामध्ये करियर करू इच्छिणारे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत  प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मूळतः विध्यार्थी केंद्र अभिमुख प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्य यांची गरज लक्षात घेऊनच हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.  यावेळी विद्यापीठातील उपलब्ध साधने व भविष्यातील भूजल या विषयीच्या संशोधनामध्ये दोन्ही विभागांना या सामंजस्य कराराचा नक्कीच फायदा होणार असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलसचिव प्रोफेसर डॉ.वी बी घुटे म्हणाले, कुलगुरू मृणालिनी फडणवीस व डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचेमुळे सोलापूर विद्यापीठा बरोबर सामंजस्य करार होणेस मदत झाली आहे. यामुळे भूगर्भ शास्त्रीतील संशोधनास मदत होणार आहे. डाॅ. कलशेट्टी यांचे योगदान यांत महत्वपुर्ण राहणार आहे. प्रास्ताविक वरिष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख यांनी केले तर विद्यापीठाच्या वतीने डॉ.विनायक धुळप यांनी केले. 

SendShareTweetSend
Previous Post

शिवसेनेने “हिंदुत्व” गुंडाळून ठेवलं ; भाजप नेत्याचा थेट आरोप

Next Post

उस्मानाबादचा घरफोड्या पिल्या राक्षेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या ; 5 चोऱ्या उघडकीस

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उस्मानाबादचा घरफोड्या पिल्या राक्षेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या ; 5 चोऱ्या उघडकीस

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970724
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group