भारतामध्ये सर्वाधिक संख्येने घरामध्ये LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना सावधानता बाळगली नाही तर दूर्घटना होण्याचा धोका असतो. LPG गॅस सिलेंडर दुर्घटनेमध्ये जखमी होण्याची किंवा एखाद्याचा मृत्यू होण्याची भीती असते. तसंच घरातील मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशावेळी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी इन्शूरन्स कव्हर पॉलिसी (Insurance for LPG Cylinder) असणे आवश्यक आहे. परंतू या इन्शूरन्स कव्हरबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे, क्लेमची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या.
गॅस सिलेंडर दुर्घटनेमध्ये कुटुंबातील सदस्य जखमी झाल्यास, त्यांचा मृत्यू झाल्यास किंवा घरातील मालमत्तेचे नुकसान झाल्यास कव्हर मिळतो.