आगामी विधान परिषद, महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार हे दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांनी या दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यात दोन्ही माजी देशमुख मंत्री, जिल्हाध्यक्ष देशमुख, शहराध्यक्ष देशमुख यांच्यात समतोल ठेवलाय.
सोलापूर शहरात पदाधिकारी बैठक, आमदार विजयकुमार देशमुखांसोबत भोजन, ग्रामीण बैठक, आमदार सुभाष देशमुखांच्या निवासस्थानी भोजन, महापौर निवासस्थानी बैठक, दुसऱ्या दिवशी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट नंतर सोलापूरात पत्रकार परिषद असा त्यांचा दौरा आहे.



















