सोलापूर- नागरिकांना सोई सुविधा देण्यात नगरसेवक तत्परतेने काम करत असून मी गेल्या काही वर्षांपासून विषबाधेमुळे बाहेर पडू शकलो नाही. आता नागरिकांनी आपले काही अडचण असेल तर कळवा. बुथ पे चर्चा या वेळी आपला विश्वास हाच प्रभागाचा विकास या कार्यक्रमातील बैठकीत नागरिकांच्या समस्या निवारण करण्यात येणार असे नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी घोंगडे वस्तीतील भाजी मंडई मधिल शाकंभरी देवी मंदिरात बैठक पार पडली. भाजी मंडई परिसरातील बुथ क्रमांक 194 मधिल नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांच्या तक्रारी दूर करणार आहे असे कार्यक्रमाच्या बुथ पे चर्चेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भागातील नागरिक तक्रारी घेऊन चर्चेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाप्रसंगी किसन घोडके, सायण्णा गालपल्ली, परशुराम संदुपटला, दत्तात्रय बडगु, सैपन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
*अशी दूर करणार तक्रार*
प्रभागातील जनतेच्या अडचणी असतील तर थेट सुरेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत तक्रार पेटीत नाव व तक्रारीची ठिकाण व संबंधित नागरिकांचे मोबाईल नंबर लिहिणे अनिवार्य राहील. काही नागरिक नगरसेवक आजारी असल्याने गप्प राहतात ते न गप्प बसता थेट सुरेश पाटील ९८५०१००९९९ या मोबाईल नंबरवर तक्रारी करावे किंवा संपर्क कार्यालयाबाहेर तक्रार पेटीत तक्रार टाका असे आव्हान करण्यात आले आहे.
प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, वीज, पाणीपुरवठा अशी सर्व कामे सर्वतोपरी पूर्ण झाले असून काही भागात अपूर्ण असल्याचे याप्रसंगी नागरिकांनी सांगितले आहे. लवकरच इतर मागण्या पूर्ण करुन व्यवस्था करून घ्यावे अशी माहिती नागरिकांनी दिले. प्रसंगी भागातील सौ. गीता संती, सौ. पासकंटी, सौ. दासरी, सौ. नडीमेटला, बुदेव्वा चनमल, सौ गड्डम, सौ. शेख, सौ तुम्मा, सत्यनारायण बोगग्यागारू, चंद्रकांत रंगम, भानुदास कटकम, गोविंद चन्ना, सुधाकर यलगम, निलेश चिलवेरी, अंबादास नडीमेटला, डॉ. पासकंटी आदी नागरिक उपस्थित होते.