राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मंगळवेढा पंढरपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार 30 मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्याच दिवशी भारतीय जनता पार्टी चे उमेदवार समाधान आवताडे हे देवेंद्र फडणवीस विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत परिचारक कुटुंबाने या निवडणुकीतून माघार घेतल्याने समाधान अवताडे यांचं पारडं जड झाल आहे भारतीय जनता पार्टीने उमेदवारी घोषित करून दोन दिवस झाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजून उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नव्हती स्वर्गीय भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे मात्र स्वतःलाच उमेदवारी जाहीर झाली त्याप्रमाणे प्रचार करत होते शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांनाच उमेदवारी जाहीर केली तसे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुपारी केले समाधान आवताडे यांच्यासाठी आमदार प्रशांत परिचारक आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दोन नेते मंडळी सरसावली आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांवर अवताडे यांना विजयी करण्याची जबाबदारी सोपवली आहे दुसरीकडे महा विकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे भारत नाना यांच्या मृत्यूनंतर भगीरथ भालके हेच त्यांचे वारसदार आहेत पहिल्यापासूनच भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळावी म्हणून मंगळवेढा आणि पंढरपूर मधील कार्यकर्ते आक्रमक होते सुरुवातीला दिवंगत भारत नाना यांच्या पत्नी जयश्रीताई भालके यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती मात्र शेवटी पक्षाने भगिरथ त्यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केली आता समोर समाधान अवताडे हे पूर्ण ताकतीने उतरल्याने ही निवडणूक काटे की टक्कर अशीच होणार आहे.




















