सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्ह्याच्या सर्वात महत्त्वाच्या जिल्हा नियोजन समितीच्या 20 नवीन सदस्यांची यादी शासनाने जाहीर केली
त्यामध्ये सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांना अपेक्षेप्रमाणे संधी देण्यात आली आहे जुबेर बागवान यांनी मागील अनेक वर्षापासून युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षसंघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत
तसेच पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या अतिशय जवळचे म्हणून जुबेर बागवान यांची मागील दोन वर्षात ओळख निर्माण झाली होती याचेच बक्षीस म्हणून त्यांना ही मोठी संधी देण्यात आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षाचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांची निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बशीर भाई शेख शफी भाई इनामदार राजू भाई कुरेशी सरफराज शेख शेरूभाई शेख रियाज मोमीन ईरफान शेख रमिज कारभारी अहमद मासुलदार सरफराज बागवान आदी पदाधिकाऱी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















