सोलापुर – सोलापूर-पुणे हायवे वरील मडकी वस्ती जवळ पती-पत्नी गाडीवर जात असताना त्यांना अडवून त्यांच्याकडील 65 हजाराचा ऐवज लुटल्याची घटना घडली याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बळीराम नारायणकर यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे ढोर गल्ली शुक्रवार पेठ या ठिकाणी राहतात ते आपल्या पत्नी सोबत रविवारी पहाटे 1 च्या सुमारास मार्डी या गावी मोटारसायकल वरून जात होते पुणे – सोलापुर हायवेवरील ह्युदाई शोरूम मडकी वस्ती जवळ आले असता पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी सचिन नारायणकर यांच्या मोटारसायकल समोर मोटारसायकल आडवी लावून फिर्यादी यांची मोटारसायकल थांबवली.
त्यांना तलवारीचा धाक दाखवून 54 हजार रुपयांचे दोन मंगळसूत्र, 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 1300 रुपये रोख रक्कम असा एकूण 65 हजार 300 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेवून दोघे पसार झाले .याबाबत अनोळखी दोन इसमाविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी देशमाने हे करीत आहेत.

















