सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आपल्या खुमासदार शैली मध्ये बोलण्यात माहीर आहेत. परंतु त्यांच्या तोंडून अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य निघाली आहेत. सोलापुरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन रोजी एका कार्यक्रमात त्यांनी थेट बोलता-बोलता “मुख्यमंत्री मरूदे” असे बोलून गेले मात्र तासभरातच त्यांनी सावरत या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
त्यामुळे ते प्रकरण तिथेच थांबले परंतु आता परत त्यांनी इंदापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ऐवजी थेट भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. यावेळी उपस्थित स्टेजवरील मान्यवरांनी त्यांना त्यांची चूक सांगितली असता त्याने परत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख केला पहा व्हिडिओ….
















