पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवार 23 ऑगस्ट रोजी दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत.
यामध्ये नियंत्रण कक्षात असलेले पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जनार्दन हनपुडे पाटील यांची शहर वाहतूक शाखा दक्षिण या ठिकाणी तर राजन आबाजी माने यांची शहर वाहतूक शाखा उत्तर तसेच अतिरिक्त पदभार विशेष शाखा या ठिकाणी बदली केली आहे
याच बरोबर नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक शांताराम यशवंत वाघमारे व अनील करबसप्पा वळसंगे या दोघांची सदर बजार व एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विशेंद्रसिंग बसवंतसिंग बायस यांची सदर बजार पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखा एमपीडीए या ठिकाणी बदली झाली आहे.


















