सोलापूर : मुरूम उत्खननातील जप्त केलेला जेसीबी परत देण्यासाठी व कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणाऱ्या पंढरपूरच्या मंडलाधिकाऱ्यासह एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
रणजीत मारुती मोरे, वय ३७ वर्षे पद- मंडळ अधिकारी, तहसिल पंढरपूर, रा. औदुंबर नगर, ता. पंढरपूर जि. सोलापूर २) खाजगी इसम शरद रामचंद्र मोरे वय ३७ वर्षे व्यवसाय शेती. रा. तुंगत ता. पंढरपूर जि. सोलापूर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी मुरुम उत्खननाबाबत तक्रारदार यांनी भाडे तत्वावर घेतलेला जेसीबी दि. १५.०१.२०२३ रोजी ताब्यात घेवून तक्रारदार यांच्या टीपर ट्रक मधुन चोरीच्या मुरुमची वाहतुक झाली असल्याबाबत सांगुन त्यावरुन तक्रारदार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी अथवा कोणताही दंड न आकारता ताब्यात असलेला जेसीबी सोडण्यासाठी १,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारली असता नमुद आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ही कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक एसीबी. सोलापूर. पोलीस अंमलदार पोहवा / सोनवणे, पोना / प्रमोद पकाले, पोना / अतुल घाडगे, पोकों/ स्वप्नील सन्नके, व चालक शाम सुरवसे सर्व नेम एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.