सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महापालिका प्रशासनाने नियम कडक केले आहेत, 14 मार्च पर्यंत रात्रीची संचारबंदी कायम ठेवली. शाळा महाविद्यालय बंद आहेत मात्र 10 व 12 अभ्यासिका व क्लास सुरू राहणार आहेत, दरम्यान महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी 8 मार्च रोजी एक आदेश काढून होम मैदान लगत स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मुंडे रोडवरील स्ट्रीट बाजार (सेल्फी पॉईंट) 14 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या सुमारास नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी होत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.


















