सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय युनिट म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसे पत्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या अवर सचिव यांनी महापालिकेला पाठवले आहे या पत्रामध्ये कोरोना विषाणूचा संक्रमणाची साखळी खंडित करण्याच्या व त्याचा प्रसार थांबवण्याच्या हेतूने लादण्यात येत असलेल्या निर्बंधाच्या प्रयोजनार्थ सोलापूर जिल्ह्याच्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रादेशिक अधिकारी क्षेत्रांमधील सोलापूर महापालिकेत स्वतंत्र प्रशासकीय युनिट म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना आता स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
त्यानंतर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना महानगरपालिकेला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत त्यामुळे आता सोलापूर शहरात कशा पद्धतीने निर्बंध शिथिल करायचे याबाबत काही वेळातच ऑर्डर काढणार असल्याची माहिती दिली त्यामुळे सोलापूरकरांनी केलेल्या मागणी अथवा आंदोलनाला आता यश आले आहे शुक्रवारपासून सोलापूर शहरात सर्व दुकाने सुरू दिसतील अशी अपेक्षा आहे.
















