सोलापूर : ज्याअर्थी, ओमायक्रॉन कोविड १९ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. या विषाणूचा प्रसाराचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता असल्याने तसेच राज्या देखील गेल्या दोन दिवसांत एक हजारापेक्षा जास्त रुग्ण संख्या दिसून येत आहेत. लग्न समारंभ, नविन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात शासनाकडील दि. २४/१२/२०२१ च्या आदेशान्वये निर्बंध लावण्यात आलेले आहेत.
ज्याअर्थी संदर्भ क्र.७ मधील दिनांक ३०/१२/२०२१ च्या आदेशानुसार कोविड १९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध ( प्रतिबंध) करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अतिरिक्त निर्देश जारी करण्यात आलेले आहेत.
ज्याअर्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च, २०२० अन्वये कोरोना विषाणू (काव्हीड- १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे, आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून, महानगरपालिका आयुक्त हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
त्याअर्थी, मी पि. शिवशंकर… आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोरोना (कोविड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरुन सोलापूर शहर हद्दीत सार्वजनिक हिताच्या दृष्टिने खालील सूचना / आदेश निर्गमित करीत आहे.
१. लग्न समारंभासाठी बंदीस्त सभागृहांमध्ये किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या ५० व्यक्तीपर्यंत मर्यादीत असेल.
२. कोणतेही संमेलन किंवा कार्यक्रम यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या ५० व्यक्तीपर्यंत मर्यादित असेल.
३. अंत्यसंस्काराच्या विधीसाठी जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या २० व्यक्तीपर्यंत मर्यादित असेल. ४. शहरातील कोणत्याही पर्यटन स्थळी किवा असे ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी / जमाव होण्याची शक्यता आहे. उदा. खुले मैदान, पर्यटन स्थळे इत्यादी अशा ठिकाणी शासनाकडील दिनांक २४/१२/२०२१ च्या आदेशातील निर्बंधाव्यतिरिक्त संबंधीत स्थानिक व्यवस्थापन प्राधिकरणास योग्य वाटतील असे निर्बंध फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ नुसार लागू करतील. ५. या आदेशाव्यतिरिक्त अस्तित्वात असलेल्या इतर सर्व निबंध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

















