आ. संजय शिंदे व संतोष पवार बोलले अजितदादांना
सोलापूर शहर सर्व व्यापारासाठी अनलाॅक करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी आमदार संजयमामा शिंदे व माझ बोलण फोन वरून बोलन झाले आहे त्यांना सोलापूरची सविस्तर माहिती दिली आहे कोरोनाची आजची शहरातील स्थितीची माहिती दिली 10 % च्या आत पाॅझिटीवीटी आहे त्यामुळे व्यापारासाठी सर्व नियम व निर्बंध लावून परवानगी द्यावी अशी विनंती दादांना केली आदरणीय दादानी सांगितले 10 % च्या आत पाॅझिटीवीटी असेल तर मंत्रालयात गेल्यावर संबंधित अधिकारी यांना सोलापूर शहर व्यापारासाठी अनलाॅक करण्यासंदर्भात सुचना करतो असे सांगितले .
सोलापूर शहरांमधील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा आता जवळजवळ दहा टक्क्याच्या खाली आलेला आहे त्यामुळे शहरातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात होती ज्या शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्केच्या खाली तसेच हॉस्पिटल मध्ये बेड भरलेले प्रमाण 60 टक्क्यांच्या खाली असेल तर त्या शहरांमध्ये सरकारने लावलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील होणार असे सरकारने स्पष्ट केले होते परंतु सोलापूर शहरांमध्ये पॉझिटिव रेट दहा टक्क्यांच्या खाली असताना बेड भरण्याचे प्रमाण 60 टक्क्यांच्या वर आहे मात्र हे प्रमाण शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे नाही तर ग्रामीण भागातील रुग्ण वाढीमुळे आहे हे जर महापालिकेच्या आयुक्ताने तसा प्रस्ताव तयार करून शासनाला निदर्शनास आणून दिले तर निश्चितच सोलापूर शहरासाठी निर्बंध काही प्रमाणात शिथिल होऊन व्यापार सुरू होऊ शकतो.


















