सोलापूर : अक्कलकोट रोड येथील ड्रेनेजच्या चेंबर मध्ये काम करत असताना मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये असे आर्थिक मदत देण्यात येणार आहे तसेच जखमी असलेल्याचे हॉस्पिटलचे पूर्ण खर्च महापालिका करण्यात येणार अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.याप्रसंगी सभागृहनेता शिवानंद पाटील महापालिका आयुक्त पी. शिवशंकर,अतिरिक्त आयुक्त विजय खोराट,नगरसेवक सुरेश आण्णा पाटील,बिजू अण्णा प्रधाने,नगरसेवक राजकुमार हंचाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

















