सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांचे नाशिक जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर साताऱ्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे हे येणार असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील तीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये डॉक्टर अर्जुन गुंडे यांचा समावेश आहे डॉक्टर अर्जुन गुंडे यांच्या पत्नी नयना गुंडे या गोंदियाच्या जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या बदलीनंतर अर्जुन गुंडे हे विदर्भात जातील अशी चर्चा होती, मात्र गुंडे हे नाशिककडे गेले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अर्जुन गुंडे यांनी साडेतीन वर्षाहून अधिक कार्यकाळ काढला आहे. त्यांच्याकडे सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हा अतिरिक्त पदभार होता, शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून गुंडे यांची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ओळख आहे.



















